#थ्रेड
आर्य म्हणजे नक्की काय?
आर्य नावाचा कोणताही "वंश" भुतलावर अस्तित्वात नाही. आर्य हा शब्द ऋग्वेदामध्ये ३४ ऋचांमध्ये ३६ वेळा आलेला आहे व यामध्ये एकाही ठिकाणी आर्य हा शब्द वंशवाचक वापरलेला नाही. ऋग्वेदाला वैदिकांचा मुळग्रंथ मानला गेला आहे. वास्तवीक "आर्य" हा कोणा जातीच्या किंवा वंशाच्या संदर्भात आहे हे म्हणने मुर्खपणाचे आहे आर्य या शब्दाचा अर्थ "सभ्य" असा आहे. "कृणवंतोविश्वमार्य" म्हणजे आम्ही सर्व विश्वाला आर्य बनवुन सोडू...वेदांमध्ये किंवा कोणत्याही वैदीक साहीत्यामध्ये आर्य हा शब्द वंशवाचक वापरलेला आढळत नाही .“आर्य" या शब्दा बाबत आणखीन थोडे खोलात जाऊ. वेदात,कोणत्याही स्मृतिंमध्ये ,गीतेत आर्य हा शब्द वंश किंवा जन्म वाचक नाही. वानर जातीचे लोक सुद्धा आर्य या नावाने कसे बोलावले गेले असते मग ? हनुमान,सुग्रीव यांना सुद्धा आर्यच म्हटले गेले आहे .वसीष्ठ ऋषी यांचे उत्तम मार्गदर्शन करतात..."ज्याने इंद्रियाना आणि मनाला जिंकले आहे...जो थोर पुरुषांनी धिक्कारलेले पापकर्म करत नाही तो आर्य आहे.
मग हा आर्य जन्म आधारित झालाच कसा?तर ह्याला मूळ कारण पर्शियन लोक...ह्यांना हिंदू धर्माच वावडं..हिंदू देवाची पूजा करतात तर हे राक्षस पूजतातहिंदूंचा इंद्र चांगला तर...ह्यांचा वाईट...असच स्वतःला चांगल म्हणण्यासाठी आर्य हा शब्द चोरून त्याला जातीवाचक केला...त्यात ब्रिटीश आले..त्यांनी भारतीय समाजात फूट पाडण्यासाठी आर्यन थेअरी जन्माला घातली...हिटलरने स्वतःच्या स्वार्थासाठी आर्यन शब्द वापरला...पर्शियन,ब्रिटिश,हिटलर ह्यांनी जी आर्य किंवा आर्यन ही वंशवादी प्रतिमा उभी केली त्याचा आणि सनातन धर्मातील आर्य यांचा काहीही संबंध नाही...आर्य म्हणजे सभ्य...इतकाच साधा सरळ अर्थ आहे.बाकी सगळं मिथ्या.
🙏जय श्रीराम🚩
छान विवेचन केले आहे.
जवाब देंहटाएं