मंगलवार, 31 जनवरी 2023

माडगूळकर फाईल्स, अमोल कुलकर्णी

 अमोल कुलकर्णी .

"माडगुळ फाईल्स : - एक वावटळ .... "

©श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर


"आम्हा गरीबांचा संसार जाळून तुम्हाला काय रे मिळणार?"... ३०-३१ जानेवारी १९४८ च्या आसपासचा दिवस....गांधीहत्येनंतरचे उसळलेले जळीत माडगूळकरांच्या गावातल्या वाड्यापर्यंत पोहोचले होते,गदिमांची आई बनुताई मोठया धीराने त्यांना विरोध करत होती,त्यातलाच एक दांडगट "ह्या म्हातारीलाच उचलून आत टाकारे,म्हणजे तरी हीची वटवट बंद होईल !" असे खवळूनच म्हणाला. तितक्यात उमा रामोश्याने म्हातारीचा हात धरून तिला बाजूला ओढले म्हणून ती वाचली,नंतर बाका प्रसंगच उभा राहिला असता. 


ढोल ताशे वाजवीत ७०-८० दंगलखोर गावात शिरले होते,हातात काठ्या,कुऱ्हाडी.. जळते पलीते होते.गावात शिरल्या शिरल्या त्यांनी गदिमांच्या धाकट्या भावाचीच चौकशी केली,भेदरलेल्या छोट्या पोरांनी त्यांना थेट आमच्याच घरापाशी आणून सोडले होते.गदिमांच्या धाकट्या भावाला दटावून गावातल्या ठराविक जातीच्या सर्व लोकांची घरे त्याला दाखवायला लावली.एका मागून एक घरातल्या माणसांना बाहेर ओढून घरे पेटवून देण्यात आली.सर्वात शेवटी परत माडगूळकरांच्या वाड्याजवळ आल्यावर गदिमांच्या भावाला स्वतःच्या वाड्यात रॉकेल शिंपडायला लावले व 'गांधी नेहरू की जय!' असे ओरडत आमचा वाडा पेटवून दिला.सारे संपले होते आमच्या वाड्याची राख रांगोळी झाली होती.गदिमांचे वडील गावातील मारुतीला साकडे लावून बसले होते,धाकटा भाऊ दिवसभर घाबरून रामोश्याच्या कणगीत लपून बसला होता.महाराष्ट्रातल्या अनेक घरात हीच परिस्थिती होती. शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली होती.


याच वेळी 'वंदे मातरम' चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण कोल्हापूरला तर काही पुण्यात पूर्ण झाले होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्रिकरण एकत्र असावे म्हणून दिग्दर्शक राम गबाले चित्रपटाच्या प्रिंट्स घेऊन रात्री कोल्हापुरातून रेल्वेत बसले.त्यांना माहित नव्हते की त्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली आहे व सगळीकडे दंगल सुरु आहे.गदिमा-पुल व सुधीर फडके यांनी साधारण तीन चित्रपटांकरिता एकत्र काम केले होते ते म्हणजे वंदे मातरम,ही वाट पंढरीची /संत चोखामेळा व पुढचे पाऊल.यातील वंदे मातरम हा स्वातंत्र लढ्यावर आधारित चित्रपट यात पु.ल व सुनीता बाईंनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते.गदिमांची गीते,कथा-पटकथा,संवाद तर फडक्यांनी संगीत दिले होते.


राम गबाल्यांच्याकडे चित्रपटाची मूळ प्रिंट एका मोठ्या ट्रंकेत भरलेली होती व रेल्वेत बसल्यावर चित्रपटाचे स्क्रिप्ट काढून ते चाळत बसले होते.तितक्यात ८-१० दंगलखोरांची एक टोळी रेल्वेत शिरली.प्रत्येक डब्यातल्या ठराविक जातीच्या लोकांची चौकशी करून त्यांच्या डोळ्यादेखत सामान रेल्वेच्या बाहेर फेकले जात होते.खूप गंभीर परिस्थिती होती,राम गबाले त्यांच्या तावडीत सापडले असते तर चित्रपटाचे अस्तित्व धोक्यात आले असते.चित्रपटाची प्रिंट व स्क्रिप्ट सर्व नष्ट झाले असते.सर्व कष्ट वाया गेले असते.गबाले स्क्रिप्ट व जीव दोन्ही हातात धरून बसले होते.


गदिमांना एक सवय होती कुठलेही साहित्य कविता,लेख पूर्ण झाला की फावल्या वेळेत ते बऱ्याचदा त्यावर चित्र/रेखाटने करून ठेवत असत.ज्याची अनेकदा दिग्दर्शकाला व अभिनेत्यांना मदत होत असे,असेच एक चित्र गदिमांनी त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या मुखपृष्ठावर काढून ठेवले होते. त्यात चित्रपटाची नायिका झेंडा हातात घेऊन त्यांनी रेखाटली होती.


८-१० जणांचा समूह राम गबाले यांच्यापाशी आला त्यातल्या एकाने त्यांच्या हातातले जाडजुड स्क्रिप्ट पाहिले व विचारले हे काय आहे. गबाले यांनी सांगितले की १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर चित्रपट काढत आहोत व त्याचे हे स्क्रिप्ट आहे. त्या माणसाने ते नीट निरखून पहिले.


वर काढलेले गदिमांचे नायिका झेंडा हातात धरलेले छायाचित्र त्यांनी पाहिले व एकदम म्हणाले "हे बेणं आपल्यातलच दिसतं आहे... चला पुढे... "


गदिमांच्या एका चित्राने तो संपूर्ण चित्रपट गांधीहत्येच्या दंगलीतून वाचविला होता.पुढे हा चित्रपट प्रसिद्ध झाला यातील "वेद मंत्राहून आम्हा वंद्यवंदे मातरम!" सारखी राष्ट्रगीताच्या तोडीची गीते खूप गाजली.एका लेखणीत किती ताकद असते याचे हे उत्कृष्ट उदाहरण!. 


या सर्व घटनांनी माडगूळकर कुटुंबीय खूप व्यथित झाले होते."या गावात राहण्यात काही अर्थ नाही... " हाच विचार गदिमांच्या व भावंडांच्या मनात ठाम झाला होता. व्यथित माडगूळकर कुटुंबीय गाव सोडणार अशी बातमी गावात पसरली,गावकऱ्यांना या बातमीने अतीव दुःख झाले.गावातल्या जाणत्या लोकांनी गदिमांची भेट घेतली ... "अण्णा,आम्ही तुमचा वाडा वाचवू शकलो नाही पण आम्ही तो तुम्हाला परत बांधून देऊ पण गाव सोडू नका ... ",अशी अनेक वावटळे येत असतात पण वर्षानुवर्ष जपलेले ऋणानुबंध इतक्या सहज तुटत नाहीत. गावकऱ्यांनी आपला शब्द पाळला ... माडगूळकरांचा वाडा त्यांनी परत उभारून दिला!. 


आज जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांची धडपड पाहून वाईट वाटते,लहान पणापासून सर्व जातींचे मित्र होते आमचे,जात-पात पाहून कधीच मैत्री केली नव्हती.....पण आज सर्वांच्या डोळ्यात या वावटळीची धूळ शिरली आहे, काहीच स्पष्ट दिसत नाही.... अधून मधून अश्या वावटळी येतच राहतील, आपल्याला मात्र हे माणुसकीच्या शत्रूसंगें चाललेले युद्ध असेच चालू ठेवावे लागेल........


(ही पोस्ट केवळ गदिमा/वंदे मातरम चित्रपटाच्या आठवणी जागवण्यासाठी आहे,अनेक वर्षांपूर्वी घडून गेले ते सत्य होते,पण यातून आपण केवळ गदिमांच्या आठवणी जागवायच्या आहेत,इतर कुठलाही उद्देश नाही व त्याला कृपया इतर रंग देऊ नये ही विनंती 🙏

सोमवार, 31 अक्टूबर 2022

फॉरेन टूर

 सर्वांनी हि पोस्ट जरूर वाचावी.

      *आयुष्यातील हार*

" मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली.


"साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"


सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.


"मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.


"आतापर्यंत आम्ही भुतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय"


अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.


"पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?" मी विचारलं


" सहपत्नीक! तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही"


" पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही" मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता.


" अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?"


सगळे शांत झाले.


"आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड" पाठक पुढे बोलू लागला "जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला....."


तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले. पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हंणालो.


पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं"

"जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये. या, छान गप्पा मारु"


ते सगळे जेवायला गेले मी मात्र रुमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौ. ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो.


"पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फाँरेन टुर्स, त्याही कमी पगारात!" मी विचारलं.


"सर विशेष काही नाही? आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. टू व्हिलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हाँटेलिंग केलं नाही. हाँटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते"


"याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजाँयमेंट काहीच केली नाही. अहो त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?"


पाठक हसला.


"साहेब एंजाँयमेंटचा अर्थ चमचमीत नाँनव्हेज खाणं, दारु पिणं, चारीत्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरीयल्स पहाणं हा असेल तर तो आम्हांला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पाँझिटिव्ह एंजाँयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? आता राहीला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहीली आहे."


बापरे हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हंटलं "बरं ते जाऊ द्या. मुळ विषयाकडे येऊ या"


"हं तर बचतीबरोबरच अँडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गँरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं"


"पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?"


" मुलं जात्याच हुषार आणि सिन्सियर होती.स्काँलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पुर्ण केली. मला फक्त परिक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत."


"आता काय करतात मुलं?"


"मुलगी साँफ्टवेअर इंजीनियर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते. तिचा नवराही इंजीनियर आहे. दोघांनी कंपनी सुरु केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसीनमध्ये. सध्या एका हाँस्पिटलला प्रँक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हाँस्पिटल उभारायचा विचार करतोय"


मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीला प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं, पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करुन माहेरी निघून येणं सुरुच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता. काँलेजमध्ये असतांना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं. दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. काँलेजमधून काढून मी त्याला बियरबार काढून दिला. आम्हांला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारु पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो.


"आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे" पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझीतंद्री भंगली.


"सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हांला. तोही खर्च आमचा वाचला."


मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पतीपत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजुनही चवळीची शेंग वाटत होती.


"साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!" पाठक बोलला.


"आमचं ठिकच आहे. औरंगाबादला या. तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लँटस् आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियरबार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय" मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.


‌"अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच रहातो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण काहो साहेब एवढी सगळी प्राँपर्टी फक्त पगारावर जमवली? की काही साईड बिझीनेसही आहे तुमचा?"


‌मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करुन कमवलं होतं. दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या क्रुपेने सहीसलामत सुटलो होतो.


‌"अहो पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरीष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?"


‌"साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं. मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की!"

‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?


‌"घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हांला"


‌पाठक निर्मळ हसला. मग म्हणाला.

‌"पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हांलाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल"


‌"हरकत नाही. येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो. गुड नाईट"


‌आम्ही रुमवर परतलो पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. 


खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बी.पी. डायबेटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश... कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकाँकचं साईटसिईंगही एंजॉय करु शकलो ‌नव्हतो.

‌ बँकाँकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

पाठकला इंप्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली.एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता.


‌"या साहेब, या मँडम" पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हाँलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं.भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपाँयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लाँवरपाँटस् होते. शोकेस ट्राँफिजने भरलेलं होतं.


‌"बापरे इतक्या ट्राँफिज!कुणाच्या आहेत या?" माझ्या तोडातून नकळत शब्द निघून गेले.


‌"सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बँडमिंटन स्पर्धेतल्या"


‌"वा छान" मी चांगलाच इंप्रेस झालो.


‌"या साहेब तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी"


‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकुण एक खोली पाठक कुटूंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी व्रुत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं.


‌बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पुर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.


‌"घ्या साहेब" पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भुक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.


‌"वा अप्रतिम!" मी पाठककडे पहात म्हणालो.


‌"साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू आम्ही ठरवला होता"


‌"अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल" मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो.


‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करुन दिल्यावर तो माझ्या आणि सौ. च्या पाया पडला.


‌"हाँस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडिल मदत करणार असतील ना तुला!"

‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.


‌"बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शुन्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून कीती अपेक्षा करायची आम्ही त्याच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर आम्हांला कायमची रुखरुख लागेल आम्हांला की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो."


‌त्याच्या सडतोड पण उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घ्रुणा वाटू लागली.


‌पाठक कुटूंबाचा निरोप घेऊन निघालो. पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटूंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटूंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.


दिवस बदलत गेले. निवडणूका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभुत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती. कारण मी आता नोकरीत नव्हतो.


‌एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर ४-५ सुटाबुटातील माणसं उभी होती.


‌"आम्ही इन्कमटँक्स डिपार्टमेंट कडून आलोय. "त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत दिलं. मी गारठलो, माझे हातपाय थरथर कापू लागले.


‌"मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?" मी कापऱ्या आवाजात विचारलं.


‌" जरुर बोला! त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे"


‌"अहो पण साहेब मी आता रिटायर झालोय."


‌"साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल" तो स्मित करत म्हणाला. 


मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरु होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. 'आता भोगा आपल्या पापाची फळं' अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या.


‌"चला साहेब" झडतीत सापडलेले बेहिशोबी ₹२५ लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला.


‌"कुठे?"


‌"चौकशीसाठी आम्ही तुम्हांला ताब्यात घेत आहोत"


‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. ‌मला अचानक पाठकची आठवण आली.


‌"साहेब एक फोन लावू?" मी विचारलं.


‌"नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स"


‌"साहेब हा माणूस साधा कारकून आहे."


‌"ठिक आहे. स्पिकर आँन करा"


‌मी पाठकला फोन लावला.


‌"हँलो पाठक मी महाजन बोलतोय! पाठक तुम्ही जिंकलात. मी हरलो."


‌"काय झालं साहेब? असं का बोलताय?"


‌"पाठक इन्कमटँक्सची धाड पडली आज बंगल्यावर! मी पकडला गेलो."


‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला.


‌"साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरुर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हांला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद असतो साहेब, काही काळजी करु नका. सगळं व्यवस्थित होईल."


‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल. नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती?साधी सहानुभूती सुध्दा त्यांनी मला दाखवली नव्हती.

‌पाठकच्या रुपात एक खरा *हितचिंतक मला भेटला होता. पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.*


🙏🙏🙏🙏🙏

शनिवार, 1 अक्टूबर 2022

IAS असीमा मित्तल मॅडम

 कामाच्या परिसीमा ओलांडणारी असिमा....


रात्री उशीराने मोबाईलची लाईट चमकली म्हणून मोबाईल हातात घेतला व व्हॉट्स अपवर आलेला मेसेज वाचू लागलो. अनेक मेसेज होते, परंतु त्यातील एकात असिमा मित्तल मॅडम यांची बदली झाल्याचा मेसेज वाचून मन अगदी रितं झालं. काल त्यांचा पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यांचं ते वागणं... शिक्षकांकडून काम करून घेण्याची पद्धत....इथल्या पाड्यांवर काम करण्याची तळमळ...आदिवासी बांधवांच्या शेतीविषयक समस्या समजून घेण्याची उदारता...वेळेच्या बाबतीत असणारा काटेकोरपणा आणि तितकीच विनम्रता असे अनेक गुण मनाला छेडू लागले आणि मग एकंदरीत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहिला.


राजस्थानमधील जयपूर या पिंक सिटीत त्यांचा जन्म 30 जून 1992 रोजी झाला. जयपूरच्या मातीतले संस्कार काल त्यांच्या पिवळ्या रंगाच्या साडीवरून दिसून आले असतीलच. नवरात्रीच्या नऊ रंगांची जादू एकंदरीत त्यांच्याही मनावर असल्याचे त्यातून दिसून आले. 


शालेय जीवनापासूनच असिमा अभ्यासात हुशार होती. परंतु ती फक्त पुस्तकी किडा देखील नव्हती. विविध स्पर्धा असोत वा शालेय खेळ यात भाग घेऊन ती त्यात नेहमी अव्वल येत असे. तिने शालेय जीवनातच अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊन यश मिळवले होते. त्यामुळे आपण कोणतीही परीक्षा दिली तरी त्यात हमखास यश मिळेल असा आत्मविश्वास तिच्या मनात तयार झाला होता.


आपले कष्ट व चिकाटी यांवरील आत्मविश्वासामुळे तिने जेईईचा फॉर्म भरताना फक्त आय आय टी, मुंबई हा एकमेव पर्याय दिला. तिच्या जागेवर दुसरा कोणी असता, तर त्याने नक्कीच 10-20 पर्याय अजून निवडले असते हे मात्र नक्की. परंतु इतिहास घडवणारी माणसं मुळात हटके असतात आणि ते कोणत्याही चौकटीत बसत नाहीत हेच असिमाच्या बाबतीत आपणास दिसून येते.


आय आय टी मुंबईत पदवीचं शिक्षण घेऊन तिने सिव्हील इंजिनिअर ही पदवी तर प्राप्त केलीच सोबत गोल्ड मेडल देखील मिळवले होते.


पदवीचं शिक्षण चांगल्या श्रेणीत पूर्ण केल्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळायला फार उशीर लागला नाही. उत्तम सोयी सुविधा असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी ती आता करू लागली होती. परंतु मन मात्र त्या ऐशोआरामात रमत नव्हतं. असिमा या अशा टिपिकल कामासाठी बनलेली नाही हे तिचं मन तिला सारखं सांगत होतं.


आपलं मन काय सांगतंय हे तिनं ऐकलं व इतक्या मोठ्या पगाराची नोकरी तिने मागचा पुढचा विचार न करता सोडली. वेळ न दवडता तिने युपीएससीच्या अभ्यासाला तिने सुरुवात केली. सिव्हील सर्व्हिसेसची ही परीक्षा फक्त पुस्तकांचा अभ्यास करून किंवा तुम्ही फार हुशार आहात म्हणून पास होता येत नाही याची जाणीव असिमा लवकरच झाली. आज पर्यंत प्रत्येक परीक्षेत अव्वल असणारी असीमा युपएससीच्या पहिल्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरली होती. खरं तर कधीही अपयश न आलेल्या प्रत्येकास हा धक्का पचवणे कठीण गेले असते. तेच असिमाच्या बाबतीत घडले. या काळात ती प्रचंड दडपण व मानसिक तणावातून गेली.यातून बाहेर पडायला तिला बराच काळ गेला. पण ती मागे हटली नाही. ती रडत नाही तर लढत राहिली.....कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांच्या दडपणाशी.


प्रचंड तणावात असताना तिने आपले छंद जोपासले. त्यात मन रमविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच दरम्यान तिला एका सरकारी संस्थेमार्फत राजस्थानमधील एका खेडेगावात भेट देण्याची संधी मिळाली. लोकांशी चर्चा करत... भेटत असताना तिची नजर घरातील एका 3 वर्षांच्या मुलीवर पडली. ती मुलगी जागेवरून हलुही शकत नव्हती. तिच्या आईशी बोलल्यावर असीमाला समजले की ती जन्मापासून अशीच आहे आणि पुरेसे पैसे नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही. समाजातील गरिबी आणि हतबलता याचा अतिशय खोल परिणाम असीच्या मनावर या घटनेमुळे झाला.असीमाची संवेदनशीलता किती प्रामाणिक आहे हे आपणास या घटनेवरून समजून येते. असीमा त्या मुलीच्या वेदनांचा विचार करून अस्वस्थ होत होती. आपण या अशा गरीब व वंचित लोकांसाठी काहीच करू शकत नसल्याची सल तिला सतावत होती. याबाबत ती अनेकदा आपल्या आईशी देखील बोलत होती. या लोकांसाठी काम करायचे असेल तर सिव्हील सर्व्हिसेस शिवाय पर्याय नाही याची जाणीव आईने असीमाला करून दिली होती.


शेवटी असीमाने दुसऱ्यांदा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली व पूर्ण मन लावून जिद्दीने अभ्यास केला. आता फक्त गोल्ड मेडलिस्ट नव्हे तर एक संवेदनशील असीमा सामाजिक भावनेतून प्रयत्न करत होती. शेवटी तिच्या कष्टाचं चीज झालं. यात तिला 328 रँक मिळून आय आर एस (आय टी)मध्ये तिची निवड झाली होती. असीमाला समाजात जाऊन काम करण्याची इच्छा व स्वप्न असल्याने ती या यशाने फार खुश नव्हती. ती सदर पदावर रुजू तर झाली परंतु ती अस्वस्थच होती.


आपली मुलगी इतकी मोठी परीक्षा पास होऊनही खुश नसल्याची जाणीव व्हायला तिच्या वडिलांना फार वेळ लागला नाही. त्यांनी तिच्याशी यावर चर्चा करून पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन तिच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.


आपल्या कुटुंबाचा आपल्यावर असलेला विश्वास व आपल्यातील जिद्द याच्या जोरावर तिला सन 2017 मध्ये इच्छित यश मिळाले. संपूर्ण भारतातून तिचा 12 व्या क्रमांक आल्याने तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. काल पर्यंतची गोल्डन गर्ल असीमा आता IAS असीमा मित्तल मॅडम झाल्या होत्या.


आता तिच्या यशावर लिहिलं जाऊ लागलं होतं. तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात होत्या. परंतु फार काळ ती या प्रसिद्धीच्या झगमगाटात अडकून पडली नाही. 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यावर मी फार काही लिहिणे उचित ठरणार नाही.


असीमा मित्तल मॅडम बोलताना नेहमी सांगतात, " फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. " आज त्यांच्या विचारांची व दृष्टिकोनाची प्रचिती आमच्या डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळांच्या बदललेल्या स्वरूपावरून दिसून येते. 


असीमा मित्तल हा फक्त एक शैक्षणिक प्रवास किंवा कष्टाच्या झाडाला लागलेलं गोड फळ नसून ती एक क्रांती आहे....ती एक विश्वास आहे...आदिवासी मुलांसाठी ती एक आत्मविश्वास आहे....नऊ दुर्गांचं जणू ती एक मानवी रूप आहे.


आज डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळा ज्या पातळीवर पोहचलेल्या आहेत, त्याची कदाचित कोणी कल्पना देखील केली नसेल. जो सकारात्मक बदल इथल्या निस्सीम निसर्गराजीत घडवून आणलाय, तो मित्तल मॅडम यांच्या प्रखर तपश्चर्येचं फळ आहे... त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाचं फलित आहे. 


त्यांची बदली हा विषय काहींसाठी आनंदाचा असेलही...परंतु आश्रमशाळेतील मुलांचा विचार केला, तर त्यांच्यासाठी पोरकं करणारा आहे. 


मित्तल मॅडम यांच्या विचारांचा कस...त्यांनी घालून दिलेली स्वयंशिस्त...सतत नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची लावलेली सवय या गोष्टी जपणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असणार आहे.


त्यांच्या डहाणू येथील प्रवासाचा विचार केला, तर कामाच्या सर्वच परिसीमा ओलांडणारी असीमा असाच आहे...!


असो नुकत्याच झालेल्या झूम मीटिंगमध्ये हाताची स्वच्छता करण्याचा त्यांचा मंत्र मनाच्या स्वच्छतेपर्यंत पोहचेल यात शंकाच नाही. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला वेधचा पुढील प्रवास भविष्यवेधी ठरेल यात शंका नाहीच...


त्यांचा नाशिक येथील जिल्हा परिषदेतील प्रवास असाच आदर्शमय राहो व यातून राष्ट्र निर्माणाचे कार्य त्यांच्या हातून घडो हीच शुभेच्छा...!


- राजू ठोकळ, दाभोण, डहाणू

सोमवार, 10 जनवरी 2022

लसीकरण विरोधात कोर्टात याचिका forwardedpost

 *८० हजार कोटींचा ‘कोरोना व्हॅक्सीन घोटाळा उघड’. लोकांचे जीव धोक्यात घालून त्यांच्या हत्येला व गरीबीला जबाबदार. आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल.*


https://rashidkhanvaccineblog.blogspot.com/2021/09/blog-post.html


कोरोना लस बनविणाऱ्या कंपनींना हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी बेकायदेशीर घटनाबाह्य आदेश पारीत करणारे भ्रष्टाचारी मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे उघड करणारे पुरावे, अहवाल व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशांच्या आधारावर आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून लवकरच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.


त्या याचिकेमध्ये दिलेल्या पुराव्यावरून स्वतःला जनतेचे पुढारी व हितरक्षक असल्याचा बनाव करुन व्हॅक्सीन कंपन्यांकडून हजारो कोटी लाच घेवून फक्त आणी फक्त त्यांच्याच भल्यासाठी काम करुन बेकायदेशीर निर्णय घेवून जनतेला वारेवर सोडून त्यांच्या मृत्यूस व इतर त्रासांना जबाबदार ठरलेले मंत्री व अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले असून जनतेमध्ये भयंकर आक्रोश निर्माण झाला आहे. दोषी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरित अटक करुन त्यांनी भ्रष्टाचारने जमविलेली सर्व संपत्ती जप्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.


अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (AIIMS) च्या संचालकांनी दिलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार कोरोना आजारातून बरे झालेली किंवा कोरोनाच्या संपर्कात आलेली लोक ही सर्वात जास्त सुरक्षित असून कोरोना निर्बंधातून त्यांना सर्वात आधी सूट मिळणे आवश्यक आहे. भारतात असे ७०% पेक्षा जास्त लोक आहेत. परंतु त्यांना सुविधा न देता भ्रष्टाचार करून लसीकरण झालेल्या लोकांनाच सुविधा देवून लस कंपनीचा हजारो कोटींचा फायदा करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो शिक्षापात्र भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग या गुन्ह्यामध्ये  मोडतो. अश्या अधिकारी व मंत्र्यांना भा. द. वि. ४०९ मध्ये जन्मठेपेची म्हणजेच आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सदरचा कोरोना लस कंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठी आदेश व निर्बंध काढण्याचा  भ्रष्टाचार हा दरवर्षी लाख कोटींच्या पेक्षा जास्त आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट कायदा ठरवून दिला आहे. [Noida Vs. Noida (2011)6 SCC 527, Vijay Shekhar Vs. Union of India (2004) 4 SCC 666] त्याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन दोन अधिकाऱ्यांना सी.बी.आय ,इ.डी यांनी अटक केली आहे. अनिल देशमुख सध्या फरार आहेत. याबाबत इंडियन बार असोसिएशन, अवेकन इंडिया मोव्हमेन्ट आदी संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित  अटक करून प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली सी.बी.आय ,ईडी , एन.आय.ए मार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे.



सविस्तर बातमी


1. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगभरातील शास्त्रज्ञांनी व नॅशनल टास्क फोर्स च्या सदस्यांनी त्यांच्या शोधांमध्ये स्पष्ट केले की कोरोना रोग हा ज्यांना होवून गेला आहे किंवा जो कोणी कोरोना रोगाच्या संपर्कात आला होता त्यांच्या शरीरांमध्ये जी प्रतीकार शक्ती तयार होते ती प्रतीकार शक्ती ही कोरोना लसींमुळे तयार होणाऱ्या प्रतिकार शक्तीपेक्षा शेकडो पटींने जास्त परिणामकारक व प्रभावशाली असते. कारण लसीद्वारे आपण फक्त अप्रभावी विषाणू किंवा तत्सम कृत्रीम रासायनिक पदार्थ शरीरात सोडून शरीराला विषाणू (Virus) सोबत लढण्यासाठी तयारी करतो. हा फक्त युद्धाचा सराव असतो. परंतू ज्या व्यक्तीला कोरोना होवून गेला आहे त्याच्या शरीराने कोरोना विषाणूंशी खरे युद्ध लढून लढाई जिकंलेली असते व त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याची, त्यांच्या जीवाला धोका असण्याची किंवा त्या व्यक्तीद्वारे कोरोना दुसऱ्यांना पसरण्याची शक्यता अजीबात नसते. एखाद्या अपवादात्मक स्थितीला सोडून तो वक्ती सर्वात सुरक्षित मनाला जातो.


2. वरील कारणास्तव कोरोना होऊन बरा झालेला किंवा कोरोनाच्या संपर्कात आलेला व्यक्ती हा सर्वात सुरक्षित मानला जातो. त्याला कोरोनाच्या निर्बंधापासून सूट त्वरीत दिली गेली पाहिजे असे तज्ञांचे मत आहे. कोरोना पासून ठीक झालेल्या व्यक्तींना फ्रान्स सरकारने ग्रीन पास जारी केली आहे. म्हणजेच त्यांना कोरोना निर्बंधातून सूट दिली आहे.


3. नुकतेच देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स च्या समुहाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण त्वरित थांबविण्याची मागणी केली असून त्यामध्ये लसीचे दुष्परीणाम व नागरिकांमध्ये आता कोरोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे इतर सर्व निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.


लिंक: https://awakenindiamovement.com/letter-to-honble-prime-minister/


वेबसाइट: www.awakenindiamovement.com


4. अश्या कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला लस देने म्हणजे त्याच्या शरीराची प्रतीकारशक्ती दुषित करने ठरत असून त्याचे जीवघेणे दुष्परीणाम होऊ शकतात याबाबत जगातील विविध देशांमध्ये शास्त्रज्ञांनी दिलेले अहवाल व भारतातील नॅशनल टास्क फोर्स चे चार महत्त्वपूर्ण सदस्य आणी All India Institute Of Medical Science (AIIMS) चे डॉ. संजीव राय यांचे याबाबत दिलेले मत हे खालील लिंक वर उपलब्ध आहेत.


Link:  https://epaper.navbharattimes.com/imageview_37204_24504_4_16_12-06-2021_6_i_1_sf.html


5. भारतात करण्यात आलेल्या ‘सीरो सर्व्हे’ नुसार अशी व्हॅक्सीन पेक्षा जास्त प्रभावी प्रतिकारशक्ती असलेले एकूण 90% + च्या जवळपास नागरिक आहेत. ती संख्या वाढत आहे.


6. त्यामुळे अश्या लोकांना कोरोना निर्बंधांपासून सर्वात आधी सूट मिळणे आवश्यक आहे व त्यामुळे सामान्य जन-जीवन लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. परंतू तसे केल्यास व्हॅक्सीन कंपन्यांचे लाखो कोटींचे नुकसान होण्याची शक्यता. असल्यामुळे व्हॅक्सीन निर्माता कंपन्यांच्या माफियांनी साकारमधील भ्रष्ट नेते व अधिकारी यांना हजारो कोटींची लाच देवून केवळ लस घेणाऱ्यांनाच लोकल ट्रेन मध्ये प्रवास तसेच ऑफिसमधील कर्मचारी हॉटेल व इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे लसीकरण केले असले पाहिजे असे बेकायदेशीर निर्बंध लावणे सुरु केले. तसेच शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा सपाटा चालविला.


7. ज्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिले आहेत तो सुरक्षित नसून त्याला कोरोना होऊ शकतो, तो कोरोना रोगाचा संसर्ग पसरवू शकतो व त्याचा मृत्यू सुद्धा करोनमुळे होऊ शकतो. करीता त्याने लस न घेतलेल्यांप्रमाणेच कोरोनाचे सर्व निर्बंध पाळावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले असून त्या कारणामुळे लस घेतलेल्या लोकांना कोणतीही विशेष सवलत देता येणार नाही. असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.


8. असे कोरोनांचे दोन्ही डोज घेतलेल्या अनेकांचे मृत्यू कोरांनांमुळे झाले आहेत. त्याबाबत सर्व माहिती Google वर, सरकारकडे व ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’ च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.


9. इंडियन मेडिकल असोसिएशन चे पूर्व अध्यक्ष के. के. अग्रवाल व दिल्लीतील 60 डॉक्टर्स ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांच्या मृत्यू कोरोनानेच झाला होता.


लिंक: (i) https://www.ndtv.com/india-news/dr-kk-aggarwal-ex-chief-of-india-medical-association-ima-dies-of-covid-19-coronavirus-2443827


(ii) https://theprint.in/health/at-least-60-delhi-doctors-have-died-in-2nd-covid-wave-families-are-left-to-pick-up-pieces/661353/


ठाणे येथील 75 डॉक्टर्स चा मृत्यू कोरोनाने झाल्याची बातमी दि. 1 जुलै 2021 रोजी दै. लोकमत मध्ये प्रकाशित झाली होती.


लिंक: https://drive.google.com/file/d/1eZGQoHzzl4pUShRYt7U0YZ82zvJ4UYEn/view?usp=sharing


10. असे असतांना त्याच ‘अप्रभावी’ लसीचे गुण-दोष लपवून केवळ लस हाच उपाय असल्याचे भासवून जनतेची फसवणूक करून जनतेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या दबाव टाकून त्यांना लस घेण्यास भाग पाडून त्यांचा जीव धोक्यात टाकून लस निर्माता कंपनीला हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सर्व आरोपी अधिकारी व राजकीय नेते यांच्याविरुद्ध भादंवि 52, 420, 304, 302, 115, 409, 471, 474, 511 r/w 120(B), 34 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम 51, 52, 53, 54, 55, 56 व कायदयातील इतर तरतुदींअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.


11. वरील सर्व निर्देश हे बेकायदेशीर व घटनाबाह्य असून असे अनेक निर्देश मा. उच्च न्यायालयांनी वेळोवेळी खारीज करून रद्दबादल ठरविले आहेत. भारताच्या केंद्र सरकारने सुद्धा लस घेणे ऐच्छिक असून लस घेण्यासाठी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणता येणार नसल्याचे व लस घेतली नाही म्हणून कोणत्याही सुविधा रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


12. महाराष्ट्र्रात नागरिकांचे हित सोडून स्वतःचे हित जपणारे बेकायदेशीर आदेश, निर्देश देणारे संबंधीत सर्व अधिकारी व मंत्र्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याकरीता दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.


दुसरी याचिका ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ चे श्री योहान टेंगरा यांनी दाखल केली आहे. याचिकेची प्रत:


Link:- https://drive.google.com/file/d/1E6eyO6mi-tV25IhkbEN8SUDvxpANatXL/view


'अवेकन इंडिया मुव्हमेंट' चे फिरोज मिठीबोरवाला यांनी ती याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेमध्ये बेकायदेशीर आदेश पारीत करणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अप्पर सचिव श्रीरंग घोलप, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना उत्तरवादी बनविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


याचिकेची प्रत:-

लिंक:- https://drive.google.com/file/d/1faalsVdH7Ff2j7o8p3IN_eDJDIs2JO-b/view?usp=sharing


भ्रष्टाचाराची व्याप्ती लाखो कोटींमध्ये:-


13. भारतात एकूण १३५ कोटी लोक राहतात. सध्या एका व्यक्तीस लसींचे दोन डोज घेण्यासंबंधी सूचना आहेत. जर १०० कोटी पात्र लोक धरले तर जवळपास २०० कोटी लसींचे डोज विकले जाणार. त्यानंतर लोकांना भीती दाखवून बुस्टर डोज व इतर अनेक युक्त्या करुन लाखो कोटी रुपये कमविण्याच्या व जनतेला नेहमीच वेगवेगळी निर्बंध लादून गुलामीत ठेवण्यासाठी या भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांनी प्लॅन करुन ठेवले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्या देशद्रोहींनी सरकारकडे लसींचा साठा उपलब्ध नसतांना त्वरीत लस घेण्याचे नियम आणले. त्यामागे त्यांचा उद्देश होतो की लोकांना लस घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात पळावे लागेल व तिथे काळाबाजार होईल व त्यांना अधिक फायदा होईल. मुंबई, पनवेल भागात कित्येकांना एक लस १००० ते ३००० रुपयांपर्यंत विकत घ्यावी लागल्याची माहीती आहे.


14. जर खाजगी रुग्णालयात लसीची किंमत १००० रुपये जरी धरली आणी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी लस कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचे बुस्टर डोज वैगेरे वाढविणे सुरु केले तर प्रत्येक डोज चे आदेश हे लस कंपन्यांना व खाजगी रुग्णालयांना जवळपास १ लाख कोटी रुपयांचा अवैध व्यवसाय व पर्यायी लाभ करुन देणारे ठरतात त्यापैकी काही हजार कोटी रुपयांची लाच ही संबंधीत मंत्री, अधिकारी, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, डॉक्टर्स आदी लोकांना दिली जाते आणी ते सर्व लोक कसेही करुन लस घेण्यासाठी लोकांवर दबाब आणतात.


15. त्याकरीता त्यांच्या कटात सामील AIIMS चे डॉ. रणदीप गुलेरीया सारख्या डॉक्टरांना लसींची खोटी जाहीरात करण्याकरीता यु-ट्यूब वर बोलाविले जाते व तो खोटी जाहिरात करतों की 'लस पूर्णतः सुरक्षित आहे'. लोकांना लसीचे दुष्परीणाम सांगीतले जात नाही. परंतु व्हॅक्सीन कंपन्यांनी कितीही मार्केटींग केली तरीही लोक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे कळल्यानंतर रातोरात बोगस नियम बनवून व निर्बंध घालून जनतेला लस घेण्यास बाध्य केले जात आहे. व्हॅक्सिन कंपन्यांच्या फायद्यासाठी जनतेचा जनतेचा जीव धोक्यात घातला जातो. यावरुन त्यांनी नैतीकतेची नीच पातळी गाठली असल्याचे स्पष्ट होते.


16. भ्रष्ट मंत्री व सरकारच्या दडपशाहीमुळे लस घेणाऱ्या नागरिकांना लसीच्या दुष्परीणामांमुळे जीवघेणे त्रास होतात कित्येक लोकांचे मृत्यु होतात. कोणाला अंधाळेपणा, बहिरेपणा येतो, पक्षघात, लुळेपणा येतो. ११ यूरोपीय देशांमध्ये भारतातल्या 'कोव्हीशील्ड अॅस्ट्राझेनीका' या लसीला बंदी घातली जाते कारण त्या लसीमुळे रक्तांच्या गुठळ्या होवून लोकांचे मृत्यू झाले होते.


17. भारतात अपोलो हॉस्पीटल सारखे भ्रष्ट हॉस्पीटल हे व्हॅक्सीन कंपनीसोबत मिळून खोटे स्लोगन तयार करतात की "No one is safe unless everyone is Vaccinated." आणि भ्रष्ट मंत्री व अधिकारी मूग गिळून गप्प बसतात. खोट्या जाहिरातीसाठी त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असतांना ती कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते.  शेवटी जागरुक नागरीक डॉक्टर्स, वकिल व संघटना पुढे येवून भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांना न्यायालयात खेचतात.


18. अपोलो हॉस्पीटलाविरुद्ध पण विविध संघटनांकडून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु असून लवकरच त्यांना न्यायालयात खेचले जाणार आहे.


19. व्हॅक्सीन माफियाच्या विरोधात संपूर्ण जगभर आंदोलन होत असून 'अमेरिकन फ्रंटलाईन डॉक्टर्स' यांच्या तर्फे अमेरिकेतील न्यायालयात याचिका दाखल करुन लसीकरण त्वरित थांबविणे आणि सरकारने लाकडाऊन व इतर निर्बंध हे औषधी कंपनीचा गैरफायदा करण्याकरीता लावण्यात आले होते असे जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.


लिंक:  

https://drive.google.com/file/d/1GTfKrq0eZS5dcUtkZXEgq3KABRytCNRk/view?usp=sharing


20. जागतिक आरोग्य संघटना World Health Organization (WHO) च्या अधिकाऱ्यांनी सदर कोरोना घोटाळा Corona Scandal/Scam मध्ये आरोपींना मदत केल्याप्रकरणीच्या पुराव्यासहित एक सविस्तर तक्रार मानव अधिकार सुरक्षा परिषदेचे महासचिव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना दि. 30 जून 2021 रोजी पाठविली आहे. त्यामध्ये व्हॅक्सीन माफिया बिल गेट्स, एम्स चे डॉ. रणदीप गुलेरीया, WHO च्या डॉ. सौम्या स्वामिनाथन, युट्यूब, गुगल, ट्वीटर व काही मिडीयातील लोक यांनी कट रचून लाखो लोकांचे खून (Mass Murder) व जनसंहार (Genocide) केल्याचे संपूर्ण पुरावे तसेच भारत सरकारच्या संसदीय समिती चा चौकशी अहवाल देवून दोषींविरुद्ध भादवि 302, 115, 304, 109, 409, r/w 120(B) आदी कलमांअंतर्गत फौजदारी कारवाईची मागणी केली.


लिंक:- (i) https://rashidkhanpathan.blogspot.com/2021/07/corona-frauds-secretary-general-of.html


(ii) https://greatgameindia.com/bill-gates-path-tribal-girls-india/


21. भारताच्या मानव अधिकार सुरक्षा परिषदेच्या त्या तक्रारीची दखल संपूर्ण जगभरात घेतली गेली असून त्याबाबत फ्रांस, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आदी देशांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. France Soir मध्ये ती बातमी ठळकरीत्या प्रकाशीत करण्यात आली आहे.


लिंक:- https://www.francesoir.fr/societe-sante/plainte-oms-india-peine-de-mort


22. इतर प्रभावी उपचार: आयव्हरमेक्टीन, व्हिटामीन डी, नॅचरोपॅथी:-


22.1. कोरोना रुग्णास "आयवरमेक्टीनची" (Ivermectin) गोळी दिल्यास रुग्णास पुर्ण आराम मिळतो रोगी पुर्ण बरा होतो, त्याचा मृत्यू होत नाही. त्याचा जीव जात नाही व त्या औषधाचे कोणतेही घातक दुष्परिणाम नाहीत असा निष्कर्ष देशातील विविध राज्यांच्या विशेषज्ञ समिती व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अमेरिका, ब्रिटेन, मधील संस्था FLCC, BIRD यांच्या लाखो लोकांवरील निष्कर्ष चाचणीचे अहवाल उपलब्ध आहेत.


22.2. नुकतेच ‘मुंबई उच्च न्यायालयाने’ 28 मे 2021 रोजी ‘गोवा सरकारच्या’ बाजूने निकाल देत इवरमेक्टीन चा वापर करण्यास परवानगी दिली आहे. [PIL WP NO. 1172 OF 2021 South Goa Advocates Association & Ors. Vs. State of Goa]


22.3. आयवरमेक्टीनची (Ivermectin) गोळी कोणत्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्त दरात अंदाजे 30 रुपयात उपलब्ध आहे. त्याचा कुठेही तुटवडा नाही.


22.4. आयवरमेक्टीनच्या गोळी घेतल्याने शेवटच्या स्टेजचा कोरोना आजार सुद्धा पूर्णपणे बरा होवून लोकांचे जीव वाचविण्याची त्या गोळीची क्षमता जगभरात सिद्ध झाली असून व्हेंटिलेटरवर असलेल्या ८८ वर्षीय वृद्ध महिलेस सुद्धा 'आयवरमेक्टीन' (Ivermectin) या गोळीच्या उपचाराने वाचविल्याचे पुरावे व अमेरिकेच्या न्यायालयाचे आदेश इंडियन बार असोसिएशनच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत:-


(i) www.indianbarassociation.in


(ii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2103


(iii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2097


२२.५. आयव्हरमेक्टिन, व्हिटॅमिन डी, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, होमीयोपॅथीक आदी व्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी व दुष्परिणाम विरहीत उपचारामुळे व्हॅक्सिन कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा होत असल्यामुळे आरोपींनी कट रचून त्या औषधांची परिणामकारकता लोकांपुढे येवू नये याकरिता यु-ट्यूब, ट्विटर, फेसबुक  अश्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा करण्यास बंदी घातली व कसेही करून व्हॅक्सिन हाच कोरोनावर प्रभावी उपाय आहे हे दाखविण्याच्या खोटा प्रयत्न केला.  आयव्हरमेक्टिन हे औषध कित्येक वर्षांपासून सर्वात सुरक्षित औषध म्हणून जागतिक आरोग्य संघठन (WHO) च्या लिस्ट मध्ये आहे. तसेच आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी द्वारे कोरोनाचे लाखो रुग्ण बरे झाल्याचे पुरावे उपलब्ध असतांना त्याला विचारात न घेता केवळ चार महिन्यात तयार केलेल्या व ज्यांची परिणामकारता सिद्ध न झालेल्या व्हॅक्सिनला  पुढे आणण्याकरिता हजारो कोटींचा भ्रष्ठाचार करण्यात आला व व्हॅक्सिनचे  जीवघेणे दुष्परिणाम लपवून त्याचाच प्रचार करण्यात आला व नागरिकांना लस घेण्यास बाध्य करण्यात आले.


22.6. अश्याप्रकारे आयवरमेक्टीनला बाजूला ठेवून लस (Vaccine) चाच आग्रह धरुन कित्येक नागरिकांचे जीव धोक्यात घालून त्यांना महागडे व घातक दुष्परिणाम असलेले औषध देणे हा औषध कंपनीचे माफियांकडून सरकारी यंत्रणेचा केलेला गैरवापर व नागरिकांची चालविलेली फसवणूक असल्याचे सिद्ध झाले आहे.


22.7. नुकतेच काही औषध व लस निर्माता कंपनीच्या माफिया यांनी [वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)] जागतिक आरोग्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मुख्य सायंटीस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मार्फत आयवरमेक्टीन संदर्भात चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला.


22.8. परंतु इंडियन बार असोसिएशनने तिला ५१ पानी कायदेशीर नोटीस देऊन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना प्रत्येक नागरिकांच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरून तिच्याविरुद्ध भादवि ३०२, ३०४, १८८, १२०(ब), ३४ अंतर्गत कारवाईचा ईशारा दिला. नोटीस मिळताच WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन ने घाबरून जावून इवरमेक्टीन चा विरोध करणारे 'ट्वीट' डीलीट करून टाकले.


22.9. इंडियन बार अससोसिएशनच्या प्रयासाने WHO च्या अधिकाऱ्यांचा भ्रस्टाचार  खोटेपणा व जनतेला मुर्ख बनवून त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या व उदरनिर्वाहाच्या रोजगारा वर गदा आणून त्यांना गरीब बनविण्याच्या प्रकार उघडकीस आला.


इंडियन बार असोसिएशनच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण जगभरात होत असून नोटीस पाठविणाऱ्या अॅड. दीपाली ओझा यांची मुलाखत अमेरीका, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका अश्या जगभरातील विविध प्रसार माध्यमांनी घेवून प्रकाशीत व प्रसारीत केल्या आहेत.


लिंक:-


1. https://www.francesoir.fr/politique-monde/livermectine-utilisee-en-inde-avec-succes-confirmee-comme-traitement-contre-la-covid


2. https://youtu.be/brlZ_77uqn8


3. https://www.bitchute.com/video/62kUVBYFAliV/


23. आयुष मंत्रालयाचे National Institute of Naturopathy Pune यांनी डॉ. बिश्वरुप चौधरी यांनी दिलेल्या नॅचरोपॅथीची उपचार पद्धती व त्यांचे अहमदनगर येथील उपचार केंद्रावर भेट देवून ही कोरोना वर १०० टक्के प्रभावी असून कोणतेही दुष्परीणाम न होता तसेच कोणतेही बंधने न पाळता सुद्धा कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा अहवाल सादर केला असून कोरोना बरा करण्याकरीता त्या पद्धतीचा वापर कोरोना बरा करण्याकरीता करण्यासाठी प्रभावी शिफारस केली आहे.


24. डॉ. बिस्वरुप चौधरी यांच्या उपायामध्ये फक्त फळांचा रस व Fluid Diet च्या माध्यमातून लाखो कोरोना रुग्ण घरीच बरे झाल्याचे पुरावे आहेत. त्यांना मास्क किंवा सोशल डिस्टंसींग वॅगेरे कोणतेही निर्बंध नव्हते.


25. जागतिक आरोग्य संघटना व शासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील वरील सर्व भ्रष्टाचारांची योग्य ती चौकशी झाल्यास लवकरच आरोपींना शिक्षा होऊन नागरिकांचे जीवन पूर्ववत येईल अशी अपेक्षा सर्व स्तरांवरुन नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 


26. जनते कडून अश्या भ्रष्ट व अनैतिक नेत्यांना, अधिकाऱ्यांना व डॉक्टराना त्वरित अटक करण्यासाठी देशभरात आंदोलने होणार असून जनतेने या देशहित कार्यात पुढे येवून सहकार्य करावे व सर्वांपर्यंत हा निरोप पोहचवून जनजागृती करून आरोपींचे पुढील प्लॅन हाणून पाडावे. आपल्या मुलांना प्रायोगिक लस देण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आवाहन “इंडियन बार असोसिएशन”, अव्हेकन इंडिया मूव्हमेंट, मानव अधिकार सुरक्षा परिषद, साहसिक संघटना, फेडरेशन ऑफ इलेक्ट्रोनिक व प्रिंट मीडिया अगेंस्ट कोरोना स्कँडल, ऑल इंडिया एस. एस. टी अँड मायनॉरिटी लोयर्स असोसिएशन, ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ ज्युरीस्टस फॉर ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन’ आदी विविध संघटनांनी केली आहे.


27. भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मूर्खांसारखे काही नियम – RT-PCR test दर १४ दिवसांनी करण्याचे आदेश.


वरील आदेशाला काहीही अर्थ नाही किंवा वैज्ञानिक आधार नाही कारण ज्या व्यक्तीने RT-PCR test केली असेल, त्या व्यक्तीला अर्ध्या तासात, एका दिवसात कधीही कोरोना होवू शकतो. एकदा RT-PCR test केली म्हणजे त्याला पुढच्या १४ दिवसात कोरोना होत नाही असा काही नियम नाही. हा केवळ मूर्खपणाचा कळस आहे. तरी सुद्धा RT-PCR test बनवणाऱ्या कंपन्या आणि टेस्ट करणाऱ्या प्रयोगशाळा यांचा हजारो कोटींचा गैरफायदा करण्याकरीता आणि जनतेचे दैनिक जीवन विस्कळीत करुन, त्यांना अधिक गरीब बनविण्याकरीता कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. जनता अधिक गरीब होवून नेहमी निर्बंधात गुलाम म्हणून राहावी अश्या दुष्ट हेतूने असे वेगवेगळे चुकीचे नियम बनविल्याचे दिसून येते.


28. मास्कचे चुकीचे नियम:-


28.1. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या दि. 27 मे 2021 च्या आदेशानुसार मास्क लावणे बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे व निरोगी लोकांना मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत कळविले आहे.


लिंक: https://drive.google.com/file/d/10f35twtB2sUl_-RWtb2vgsJK70YGAPfP/view?usp=sharing


मग असा प्रश्न उपस्थित होतो की मुंबई महापालिकेने मास्क न लावण्याच्या कारणावरुन नागरिकांना वेठीस धरुन ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड कसा वसूल केला?


28.2. मास्कमुळे कोरोनांच्या विषाणूंपासून बचाव होतो असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.


खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना हा विषाणू चांगल्या मास्क च्या छिद्राच्या शेकडो पटीने लहान असून तो सहज पणे मास्कमधून जावू शकतो.


28.3. मास्क लावण्याचे कोणतेही सकारात्मक परीणाम समोर आले नसून मास्क लावून, सर्व निर्बंध पाळून, सर्वात जास्त लोकांना व्हक्सीन देणाऱ्या केरळ राज्यात कोरोना रुग्णांची ही देशात सर्वाधीक जास्त प्रमाणात आहे. व ती रोज वाढत आहे.


28.4. मास्क चा वापर केवळ रुग्णांना भेटण्यासाठी जातांना करणे अपेक्षीत असून आठ तासापेक्षा जास्त मास्क घालू नये असे उत्तर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिले आहे.


28.5. मास्क लावल्यामुळे तुम्ही नाकाद्वारे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू परत घेतात त्यामुळे तुमच्या शरीराला ऑक्सीजन कमी मिळतो. त्यामुळे फुफ्फुसे (Lungs) निकामी होण्याची व विविध गंभीर आजार जडण्याची शक्यता असते.


28.6. दुसऱ्या लाटेत अनेकांना अधिक ऑक्सीजनची आवश्यकता भासली होती त्यामागचे कारण मास्कचा अत्याधिक वापरही असू शकते. असे तज्ञांचे मत आहे. 


28.7. तरीसुद्धा शासनाने नागरिकांना मास्क लावण्याचे बंधन घालून नागरिकांकडून कोट्यावधींचा दंड वसूल करून नागरिकांवर अत्याचाराची सीमा गाठली आहे.


 त्यावरून त्यांच्या उद्देश्य जनतेच्या हिताचे रक्षण करणे नसून स्वतःचा गैरफायदा करून घेणे आहे असे स्पष्ट होते.


29. सरकारचे फक्त एकच ध्येय दिसते ते म्हणजे कसे ही करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांना दहशतींमध्ये ठेवून औषध व व्हॅक्सीन विक्रेत्या कंपन्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे धोरण राबविणे हे होय. त्याकरिता संबंधीत मंत्री व अधिकाऱ्यांना हजारो कोटींची लाच देण्यात आली आहे .


 नागरिकांनी वेळीच जागरूक होणे गरजेचे असून या अन्यायाविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमची येणारी पिढी वाचणार नाही वाचलेली लुळी पांगळी गरीब व गुलाम म्हणून जगण्यास बाध्य राहील.


30. अधिक माहितीसाठी ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ व ‘इंडियन बार अससोसिएशनच्या’ वेबसाईट वर बघावे.


Link:


1.     www.indianbarasso ciation.inbe


2.     www.awakenindiamovement.com

रविवार, 28 नवंबर 2021

ज्योतिबा फुले विकिपीडियावर

 *🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*

➿➿➿➿➿➿ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,  

             चंद्रपूर 9403183828                                             

           

                *महात्मा*

     *जोतीराव गोविंदराव फुले*

        (भारतीय समाजसुधारक)


     *जन्म : ११ एप्रिल १८२७*

        (खानवडी, पुणे,महाराष्ट्र)

     *मृत्यू : २८ नोव्हेंबर  १८९०*

              (पुणे, महाराष्ट्र)


टोपणनाव : जोतीबा, महात्मा

संघटना : सत्यशोधक समाज

प्रमुख स्मारके : भिडे वाडा, 

                       गंज पेठ ,पुणे

धर्म : हिंदु

प्रभाव : शिवाजी महाराज,थॉमस पेन

प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे

वडील : गोविंदराव फुले

आई : चिमणाबाई फुले

पत्नी : सावित्रीबाई फुले

अपत्ये : यशवंत


प्रस्तावना:-

आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते समाज सुधारक आज मानवी जीवनातअमर झाले आहेत.

    असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. ही पदवी त्यांना ई. स. 1888 मध्ये मिळाले शेतकऱ्यांच्या हितासाठी "शेतकऱ्यांचे आसूड" हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता सूर्या परी सत्यप्रकाश पिरिता|शांती सर्व देतो| चंद्र जैसा|तोच खरा महात्मा म्हणावा. अशा थोर महात्मा ला कोटी कोटी वंदन...!!


जोतीराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता .

                  

💁‍♂ *बालपण आणि शिक्षण*

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.


जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना सेंद्रीय बुद्धीवंत असे संबोधले आहे.  जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नवलोंकीक होता.

      त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून कडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व जोतिष कबीरांचे अनेक दोहे पाठ झाले. त्यातील एक


नाना वर्ण एक गाय एक रंग है दूध


तुम कैसे बम्मन हं कैसे सूद | |


🚸 *शैक्षणिक कार्य*

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:


विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.


🔮 *सामाजिक कार्य*

 मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.


‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या  सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली.


संसाराविषयी फुले यांचा दृष्टीकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणा-या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो. 

स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे  प्रांताचे देशाचे खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .

आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .

आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री  पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्यवर्तन करणारा म्हणावे

आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे

स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह आपल्या भाऊबंदास आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांंचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णूता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात


सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||


न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||


धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||


सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||


दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||


विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||


स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ || स्वतः हितासाठी खर्च जे करती ||अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||


निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१||


सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||


होईना भूदेव जाती मारवाडी || मानवा न पीडी || सर्ववत ||३||


अशा सज्जनास मानव म्हणावे || त्यांचे गुण घ्यावे || जोती म्हणे ||४||


क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी | तो खरा बळी || मानवात ||१||


सर्वांभूती द्या हृदयी कोमल || घालितो अगळ || इंद्रियांस ||२||


जगात वर्ततो सद्गुणी मवाळ || वासनेस मूळ || डाग नाही ||३||


सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी || तोच सत्यवादी ||'जोती म्हणे ||४||



निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||


त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले || स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||


कोणास न पीडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३||


खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||



सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||


सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||


सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||


मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||



सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||''जेथे आहे ||१||


जेथे जागा धीर सदा हृदयात ||''सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||


पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||


धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||


जोतीराव शूद्रादिअतिशुद्र यांना आपल्या काव्यात यशस्वी जीवनाचा उपदेश हि करतात... ते म्हणतात,


क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे | कुटुंब पोसावे आनंदाने || १ ||


नित्य मुली- मुलं शाळेत घालावे | अन्नदान द्यावे विध्यार्थ्यांस ||२ ||


सार्वभोम सत्य स्वतः आचरावे |सुखे वागवावे आर्यभट्टा || ३ ||


अश्या वर्तनाने सर्वां सुख द्याल | स्वतः सुखी व्हाल जोती म्हणे || ४ ||


   *==सत्यशोधक समाज==*

 २४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.


📝 *लेखन साहित्य*

सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.


रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.


जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. 


📝 *त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-*

लेखनकाळ साहित्य प्रकार नाव

इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न

जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा

जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी

इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब

इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी

सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत

मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट

एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ

२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक

१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड

४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत

११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र

१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १

ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २

१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा

२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर

२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र

जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी

इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना

१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र

इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक


_🌀 *फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम*_


अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना

१. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म [पुणे].

२. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.

३. इ.स. १८४० नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्री नावाच्या कन्येशी विवाह.

४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.

५. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार .

६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.

७. इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .

८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.

९. इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.

१०. इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.

११. इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.

१२. नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.

१३. इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.(पुनरावृत्ती)

१४. इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.(पुनरावृत्ती)

१५. इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.(पुनावृत्ती)

१६. सप्टेंबर ७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.(पुनरावृत्ती)

१७. इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.

१८. मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

१९. नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.(पुनारावृत्ती)

२०. इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

२१. इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.

२२. इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.

२३. इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.

२४. इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

२५. इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.

२६. इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

२७. इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

२८. इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

२९. इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

३०. २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.

३१. इ.स.१८७५ शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

३२. इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

३३. इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

३४. इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

३५. इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

३६. इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा'समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

३७. इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

३८. इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

३९. ११ मे इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

४०. नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.


_♨ *पश्चात प्रभाव (लीगसी)*_

_महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला._


_⚜ *तृतीय रत्‍न*_

_तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली._


_या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये पुरोगामी सत्यशोधकमधून एप्रिल, मे, जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत. आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त, परिणामकारक करण्यासाठी नाटक या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता._


_🎭 *नाटकाचे स्वरूप*_

_या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. पथनाट्य म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे._


_या नाटकातील विदूषक हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे हा विदूषक एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते._

    _महात्मा फुले लिखित ऐतिहासिक तृतीय रत्न हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या. या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले._


_📚 *महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके*_

_असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे_

_क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)_

_पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार_

_महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी_

_महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर_

_महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर_

_महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे_

_महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो_

_महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत_

_महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर_

_महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य_

_महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी_

_महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर_

_महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई_

_महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर_

_महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन_

_महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे_

_महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)_

_महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन_

_महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे_

_महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके_

_महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे_

_महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे_

_महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी_

_महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण_

_महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)_

_महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान_

_महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे_

_महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो_

_महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे_

_महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे_

_महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर_

_महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार_

_महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ_

_महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी_

_युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार_

_युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)_


_🎭🎞 *नाटक, चित्रपट*_

_महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे._

_महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव_

_महात्मा जोतीराव फुले (नजरियात और उनका अदब (उर्दू )लेखिका : डा नसरीन रमजान सैय्यद)_

_मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे._

_सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे_


_💎 *समारोप*_

_विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,_

_त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास._

_परि स्त्री शिक्षण हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास, या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते._


_🏵 *सन्मान*_

_महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते._

      _जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता._

     _जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे. सत्यशोधक नावाचा एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढणार होते. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले यांची आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारणार होत्या. समता फिल्म्सचा हा चित्रपट २०१५ सालापासून रखडला महाराष्ट्रातले भाजप सरकार आणि केंद्र सरकार फुलेंच्या जीवनावर एक चित्रपट काढणार असल्याचे जाहीर झाले हॊते, पण फॆब्रुवारी २०१७ नंतर त्या चित्रपटासाठी काही झाल्याचे दिसलॆ नाही. जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत._

   

        🇮🇳 *जयहिंद* 

          स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                    

रविवार, 11 अप्रैल 2021

Jyotiba phule

 इस पोस्ट में एक एक कथन पूर्णतः मूल स्रोत सहित है। 


समान्यतः फुले को बहुत बड़ा शिक्षाविद कहा जाता है। लेकिन सत्य कुछ और है। 1882 ई में, हंटर शिक्षा आयोग के समक्ष जिस तरह का ब्राह्नणों के विरुद्ध फुले अपनी बात रखते हैं। उसमें घृणा ही घृणा दिखाई पड़ती है। फुले, स्कॉटिश और अमेरिकी मिशनरी का अपना एक गिरोह था। जिनका काम था इसाईयत का प्रसार । 


◆◆◆◆


प्रश्न: 1882 में हंटर का भारतीय शिक्षा आयोग  (Hunter’s education commission) क्या था?


उत्तर: यह एक शिक्षा आयोग था, जिसका उद्देश्य था शिक्षा के नाम पर हिंदुओं को आपस में बांटे। 


1871 में भारत की पहली जनगणना के पूरा होने के बाद, नवंबर 1877 में, #W_Hunter को राजपत्रकारों का महानिदेशक नामित किया गया, जो पहले से ही 1869 -1875 के बीच बंगाल में कास्ट के आधार पर सांख्यिकीय सर्वेक्षण में शामिल था। 1881 से हंटर के सम्पादन  में सभी चल रही परियोजना से संबंधित आंकड़ों और सूचनाओं को एकत्र और उसके परिणाम को ध्यान में रखकर,  “कोलोनी राजपत्र (imperial gazetteers) के तहत सामने आना शुरू हुआ।[1, page 45]


[1] Castes of Mind – Colonialism and the Making of Modern India by Nicholas Dirk

[https://press.princeton.edu/books/paperback/9780691088952/castes-of-mind](https://press.princeton.edu/books/paperback/9780691088952/castes-of-mind)


👉१८८१ में की गई जनगणना के आधार पर तथा मिशनरी शिक्षाविदों के दबाव में गठित  #Hunter’s_education_commission  का मूल स्वरूप यह था की एक एक ऐसा वर्ग है जिसे विशेष व्यवहार (#classes_requiring_special_treatment)  करने की आवश्यकता है. जैसे "#Chiefs_and_nobles" , #Aborigines"  "#Low_castes" "#Musalman"  "#Poor_classes". सभी अलग लग वर्ग के लिए अलग लग सुझाव दिए गए थे।[2, page 480]


#हंटर_आयोग ने निम्नलिखित सुझाव दिए :

★1. #Aborginal (बायबल का शब्द है) ओर #Low_Caste को शायद ही कभी भारत में शिक्षा मिला है। क्योंकि उन्हें जानकर बूझकर गरीब एवम समाज से दूर रखा गया था। इनकी समस्त फीस माफ कर दी गयी। एक्स्ट्रा पैसे देने के लिए कहा गया। जहाँ भी सम्भव हो उनके लिए अलग स्कूल बनाया जाए। [2, page 510]

★2. पहली बार आरक्षण की विशेष व्यवस्था की गयी थी। वह भी मात्र मुसलमानों के लिए। [2, Page 506]

★3. Poor Class को प्राथमिक शिक्षा दी जाएगी। लेकिन उच्च शिक्षा के लिए, सरकार निर्णय लेगी की उस बच्चे को पढ़ाना है कि नहीं। सरकार ऐसा तभी करेगी जब वह बच्चा योग्य होगा। [2, Page 518]


👉ध्यान देने वाली यह है कि अभी तक, ब्रिटिश सरकार की सहायता से बहुत सारे मुस्लिम संथाएँ बन चुकी थी या बनाए जा रहे थे। जैसे 'अंजुमन- ए-इस्लाम' 'Central National Muhammad Association', 'मदरसा-ए-आज़ाम', इत्यादि। इन सभी मुस्लिम संस्थानों का निर्माण इसलिए किया गया था ताकि उस समय हिन्दू राष्ट्रवाद के तहत कांग्रेस एवं मद्रास महाजन सभा के प्रभाव को कम किया जा सके।

[2] Indian Education Commission 1882, Hunter Commission Report

[http://14.139.60.153/](http://14.139.60.153/)

◆◆◆◆


प्रश्न: 1882 में शिक्षा समिति के माध्यम से बॉम्बे में ब्राह्मण विरोधी आंदोलन में ‘’#माननीय_जोती_फुले’’ और #मिशनरी की क्या भूमिका थी?


उत्तर: 1872 से 1882 की अवधि ब्राह्मण विरुद्ध अवधारणा बनाने में बहुत महत्वपूर्ण था।


👉यह नहीं भूलना चाहिए कि 1872 की पहली जनगणना में कोई भी “#Low_Caste” नहीं थी। लेकिन, आश्चर्य यह होता है कि अगले 10 वर्षों में, 1881 जनगणना में ऐसा क्या हुआ कि, “बॉम्बे” में एक नई पहचान "#Depressed_Caste" बना दी गई, वह भी केवल बॉम्बे में, किसी और प्रान्त में नही। आश्चर्यजनक रूप से, इसका उल्लेख 9.31% जनसंख्या के साथ "हंटर शिक्षा आयोग" में भी किया गया था। [2, Page 516] क्या यह मात्र एक संयोग था? इसके अलावा, हंटर के शिक्षा आयोग ने यह नोट किया गया था कि "इस वर्ग से है ही डकैतों और अन्य आपराधिक संगठनों के रैंक की भर्ती की जाती है।"


[1881 में सेन्ट्रल’ प्रोविनेंस में “#Inferior_Caste” की एक नई पहचान बनाई गयी. 1871-72 में च्निहित बाइबल आधारित “#OutCast” नामक प्रजाति विलुप्त हो चुकि होती है. इसी के स्थान पर नया “#Low_Caste” “#Depressed_Caste” और “Inferior Caste” शब्द का उपयोग किया गया है.[5, Page 323]]


👉इस आयोग में मिशनरी की भूमिका को स्पष्ट रूप से नोट किया जा सकता है, जब “#Low_Caste” के लिए शिक्षा पर बॉम्बे के “इसाई बिशप” का एक पत्र, दिनांक 1882 अक्टूबर को आयोग के समक्ष रखा गया था।[2,Page 513] इसके अलावा, वह “माननीय श्री जोती फुले” ही थे जिन्होंने हंटर आयोग के समक्ष उपस्थित होकर कई ब्राह्मण के विरुद्ध बाते कहीं। ऐसा श्री फुले ने क्यों किया? इसे समझने के लिए, जोती फुले और मिशनरी की आपस में मिली हुई भूमिका को देखना होगा।


आइए देखें !


👉जोतिराव फुले (माली परिवार में जन्मे) एक #व्यापारी, ब्रिटिश सरकार के लिए #श्रमिक_ठेकेदार और पेशवा बाजी राव द्वितीय द्वारा दी गई #35_एकड़ जमीन के मालिक  थे, जो उन्नीसवीं शताब्दी के अंत में महाराष्ट्र में “ब्राह्मण विरुद्ध” और जाति विरोधी आंदोलनों में प्रमुख प्रस्तावक थे। वे मिशनरी शिक्षकों से बहुत प्रभावित थे। बचपन से ही वे “#स्कॉटिश_मिशनरी” से जुड़े थे, उनके पिता ने उन्हें अपने घर से निकाल दिया। कारण ज्ञात नहीं है, लेकिन कोई मान सकता है कि संभावित कारण क्या हो सकता है। अमेरिकन मिशनरी  से जुड़े रखने के लिए.  [3, Pages 105, 135, 256, 106, 118]


👉एक भी ऐसा प्रामाणिक स्रोत नहीं मिला जो 1855 ई तक उनके द्वारा “लड़कियों के स्कूल” के लिए समाज के प्रति उनके योगदान का हवाला दे सकता है। उनके बारे में जो भी मूल स्त्रोत हैं,  सब में इसाई मिसनरी की भूमिका मिलती है। [3, Page 112] समस्त इसाई पत्रिकाओ में मिली जानकारी के अनुसार, 1855 ई के पहले उन्होंने अपने जीवन में कभी भी के “कास्ट” या “ब्राह्मण” के विरुद्ध एक भी व्यक्तव्य नही दिया। लेकिन फिर अचानक क्या हुआ कि 1869 ई के बाद वे ब्राह्मणों के खिलाफ हो गया? 1855 से 1869 के बीच फुले ने क्या कार्य किया इसका कोई मूल स्त्रोत नही मिला (लेकिन इसका उत्तर नीचे मिलेगा)|


👉उनके सभी काव्य लेखन अमेरिकन #मिशनरी_पब्लिकेशन "#ज्ञानप्रकाश" में या मिशनरी से जुड़े संस्था में या सहयोग से प्रकाशित हुए थे। सब 1869 ई के बाद लिखे गए थे। 1863 में लंदन से वापस आए मित्र वासुदेव बाबाजी नवरंगे (इसाई ब्रह्म समाज के सदस्य, वही मोहन रॉय वाला) की वापसी के बाद तथा अमरीकी मिशनरियो के जुड़ने के बाद ही श्री फुले ब्राह्मणों के आलोचक बन गए।[3, Page 135] अब तक (1855-1869) श्री फुलेजी को "मैक्समूलर" के कार्य के बारे में पता चल गया था (कैसे पता चला? इसका उत्तर नीचे है) “इसाई मैक्समुलर” और “मिशनरी शेरिंग” की बाइबिल की परिकल्पना को आगे बढ़ाने वाले वह पहले भारतीय थे, जो ब्राह्मणों को “सफेद काकेशस रेस एरियन ट्रायब (Arian Tribe of white caucasus race)” से जोड़कर तथा उनके द्वारा महाराष्ट्र में आक्रमण और स्थानीय निवासी लोगो की विध्वंश की बात करते हैं। श्री फुले आगे कहते हैं कि “ब्राह्मणों ने इस “कास्ट” का आविष्कार किया और इसे धार्मिक कानून के माध्यम से जोड़कर सबको सामाजिक भेदभाव के लिए मजबूर किया।[3, Page 136, 142]


[3] O'Hanlon, Rosalind (2002). Caste, Conflict and Ideology: Mahatma Jotirao Phule and Low Caste Protest in Nineteenth-Century Western India

[https://epdf.pub/caste-conflict-and-ideology-mahatma-jotirao-phule-and-low-caste-protest-in-ninet.html](https://epdf.pub/caste-conflict-and-ideology-mahatma-jotirao-phule-and-low-caste-protest-in-ninet.html)


👉1872 की जनगणना के बाद,  1873 में तथाकथित '’सत्यशोधक समाज” की स्थापना श्री फुले जी करते हैं. जिसका उद्देश्य सिर्फ यह था कि “एरियन ट्रायब ब्राह्मणों” और उनके द्वारा बनाए कास्ट” के  खिलाफ लड़ने में एक संस्थान बनाना।[3, Pages 101, 229] अगले 10 वर्षों में उन्होंने "बॉम्बे प्रान्त" को  ब्राह्मण विरोधी आंदोलन के लिए मंच बना दिया। यही कारण है कि 1882 में “#हंटर_कमीशन” के समक्ष फुले ने तर्क दिया कि यह ब्रिटिश सरकार की अज्ञानता थी, जिसने “ब्राह्मणों की सख्ती और कानूनों को देने की अनुमति दी, यहाँ के लोगों पर ब्राह्मण पहले से ही अधिकार बनाया हुआ था.[4]”

[4][https://drambedkarbooks.com/2015/04/08/rashtrapita-jotiba-phules-memorial-address-to-the-education-commission/](https://drambedkarbooks.com/2015/04/08/rashtrapita-jotiba-phules-memorial-address-to-the-education-commission/)


👉इसी बीच 1847-1857 तक R. J. Stevenson, B. H. Hodgson और Bishop Caldwell  ने संस्कृत के 'द्रविड़' शब्द का उपयोग करके,  व्यवस्थित रूप से, योजनाबद्ध तरीके “अबॉर्जिनल द्रविड़ रेस (Aborinal Dravidian Race)’' की नींव रखी थी।[5, Page 63] इसी समय 1857 ई में मद्रास विश्वविद्यालय के निर्माण  के बाद, कॉलेज के माध्यम से इसका प्रचार किया जा रहा था। यह बात जानना अत्यधिक आवश्यक है कि #R_J_Stevenso #स्कॉटिश_मिशनरी_सोसाइटी द्वारा भारत भेजे जाने वाला पहला व्यक्ति था तथा हमारे #माननीय_फुले जी इस मिशनरी के साथ दृढ़ता से जुड़े थे। इन सब आपसी जुड़ाव एवं संथागत कार्य के द्वारा 1870 ई तक, Arian Tribe invaders of white caucasus race के परिकल्पना को गति मिल चुकी थी। माननीय फुले ने भी इसका भरपूर प्रचार किया, वास्तव में वह ऐसा करने वाले पहले ब्रिटिश भारतीय थे।

[5] Breaking India by Rajiv Malhotra, Page 63.

[https://ia803102.us.archive.org/9/items/BreakingIndia/Breaking%20India_text.pdf](https://ia803102.us.archive.org/9/items/BreakingIndia/Breaking%20India_text.pdf)

◆◆◆◆


प्रश्न. ब्राह्मण विरोधी आंदोलन के लिए बंबई एक युद्ध का मैदान कैसे बन गया? और जनगणना 1881 के साथ इसका क्या संबंध है?


उत्तर: जैसा कि हम सभी जानते हैं कि 1871-72 की पहली जनगणना में Low Caste का कोई अस्तित्व नहीं था। माननीय फुले ने Low Caste की पहचान बनाने में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाई क्योंकि 1869-1873 के बीच माननीय फुले ऐसी नई अवधि में प्रवेश करते हैं जहां वे अचानक ब्राह्मणों के आलोचक बन गए।


👉'स्कॉटिश और अमेरिकन मिशनरी' से बायबल प्रेरित प्रायोजित योजना के तहत, उन्होंने कई काव्य लेखन जैसे कि i) राजा छत्रपति शिवाजी भोसले का एक गीत (भल्लाढ़), जून 1869, बॉम्बे; ii) 'प्रीस्टक्राफ्ट एक्सपोज़्ड (Priestcraft Exposed); बाद में उसी वर्ष प्रकाशित हुआ, और iii) गुलामी (Slavery), 1873 में प्रकाशित हुआ। ये सभी लेखन मिशनरी प्रायोजित प्रकाशन में प्रकाशित हुए थे। [3, Pages 136]


👉"राजा छत्रपति शिवाजी भोसले" काव्य लेखन में, श्री फुले ने कल्पना की, कि कैसे सत्रहवीं शताब्दी के मराठा क्षत्रिय ब्राह्मणों द्वारा शोषित थे। इस काव्य के माध्यम से श्री फुले ने, छत्रपति शिवाजी महाराज को महाराष्ट्र के इतिहास और संस्कृति की चौंकाने वाली नई और अति-ब्राह्मण विरोधी व्याख्या से जोड़ दिया। उन्होंने 'शिवाजी' और पौराणिक 'राजा बाली' के बीच बाहरी (ब्राह्मण) उत्पीड़कों के खिलाफ शूद्र जातियों के नेताओं के बीच एक काल्पनिक समानांतर रूप रेखा बनाई। [3, Page 136]


👉उनका "प्रीस्टक्राफ्ट एक्सपोज्ड" काव्य, पौराणिक 'राजा बाली' को विदेशी arian tribe के पूर्व काल क्षेत्र से जोड़ा। [3, Page 136]


👉गुलामी (Slavery) काव्य में, श्री फुले ने बताया कि कैसे एक #वामन (ब्राह्मण, विष्णु का एक अवतार) ने #राजा_बलि को मारा और परशुराम ने क्षत्रियों का विनाश किया। [3, Page 137]


👉श्री फुले ने, 'किंग बाली' का चित्रण की को इसाईयों के अवधारणा के आधार पर आत्मसात करके, अपने स्वयं के दिव्य दृष्टिकोण से "#जीजस" को जोड़ा। इसी काव्य में श्री फुले ने ब्राह्मणों को Cunning (दुष्ट) पुजारी भी कहा। [3, Pages 203,


👉श्री फुले ने बॉम्बे में ब्राह्मण-विरोधी आंदोलन के लिए मंच निर्धारित किया और 1880 के अंत तक एक नई पहचान 'Low Caste'' बनायी, और इसी नयी पहचान का जनगणना 1881 में इसका विशेष उल्लेख पाया गया। इसी के तहत नई श्रेणी "डिप्रेस्ड कास्ट" बनाई गई थी, जिसका पिछली जनगणना में 1871-72 कोई अस्तित्व नहीं था। जनगणना 1881 ई में ध्यान देने वाली सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इसमें ब्राह्मणों की शिक्षा के लिए रिकॉर्ड और उनकी जनसंख्या की एक विशेष तालिका बनाई है और इसकी तुलना नव निर्मित 'डिप्रेस्ड कास्ट' से की गई। यह विशेष टेबल केवल बॉम्बे के लिए दर्ज की गई है। अन्य प्रांतों के लिए इस तरह के कोई रिकॉर्ड नोट नहीं किए गए थे। जिससे यह सिद्ध होता है कि यह सब एक विशेष उद्देश्य से प्रायोजित था, ब्राहम्ण विरुद्ध आन्दोलन करवाना था। वही जो मैक्स मुलर चाहता था।


[हमने ऊपर देखा कि हंटर एजुकेशन कमीशन 1882 द्वारा बहुत भी इस 'Depressed Caste' का विशेष उल्लेख किया गया था। साथ साथ नव निर्मित '' Low Caste'' को विशेष शिक्षा देने के समर्थन में, बॉम्बे के इसाई बिशप ने, हंटर आयोग को अक्टूबर 1882 में एक पत्र लिखा था।]

◆◆◆◆


प्रश्न. भारतीय जनगणना 1881 में हिंदुओं को कैसे विभाजित किया गया था?


उत्तर: हिंदुओं को उनके आजीविका तथा इस धारणा के साथ कि हर कोई "Arian Tribe व्हाइट कॉकेशस रेस" और "इथियोपियन ब्लैक कुशिस्ट रेस" का मिश्रण है, के आधार पर 14 अलग-अलग श्रेणियों में विभाजित किया गया था जैसे सुपीरियर कास्ट्स, इंटरमीडिएट कास्ट्स, ट्रेडिंग कास्ट्स, पास्टरल कास्ट्स, कास्ट्स पके हुए भोजन, कृषि कास्ट, कारीगर कास्ट, बुनकर कास्ट, कास्ट, मछली और सब्जियाँ, नौका विहार और मछली पकड़ने की जातियाँ, नर्तकियाँ, संगीतज्ञ, भिखारी कास्ट इत्यादि। इसके अतिरिक्त, हिंदुओं के एक वर्ग की पहचान Aborginal Tribe के रूप में भी की गई थी।[5, 211]


👉सबसे हास्यास्पद यह है कि इस जनगणना के अनुसार ब्राह्मण, बाभन, और पंडित तीनो अलग है। ब्राह्मण #सुपीरियर_कास्ट, बाभन #इंटरमीडिएट_कास्ट, और पंडित #Aborginal_Tribe हैं। 🤷‍♂️ [5, 211]


👉इस जनगणना के अनुसार पासी ट्राइब हैं। खटीक कास्ट हैं। इस जनगणना में यह पहचानने की कोशिश की गई कि कौन एक दूसरे के संबंध में  Low caste का है। उदाहरण: बरार में खटीक, वडार से सुपीरियर है; चमार कास्ट महारों से सुपीरियर है (पृष्ठ 325)।


👉अब तक "द्रविड़" की पहचान बन चुकी हुई थी, कुल 25 बार यह शब्द 1981 में भारत की जनगणना में आया। 1871 की भारतीय जनगणना के विपरीत एक भी बार यह शब्द का उपयोग नहीं किया गया था। इसी तरह Aryan शब्द का 14 बार उपयोग किया था। ध्यान रहे कि आर्यन शब्द एक बार भी 1871 के जनगणना में नहीं आया था।


👉जनगणना 1881 Outcast शब्द का उपयोग 27 बार हुआ, लेकिन पिछले जनगणना के अनुसार सूचिबद्ध टेबल के प्रारूप में नहीं था, बल्कि मध्य केंद्रीय प्रांतों और बॉम्बे की जनगणना में इसकी जगह Inferior Catse और Depressed Caste सूचिबद्ध टेबल को जोड़ा गया (पृष्ठ 206, 208, 212, 323)


[5] Census of British India taken on the 17th of February 1881

[https://ruralindiaonline.org/library/resource/report-on-the-census-of-british-india-taken-on-the-17th-of-february-1881-vols-i-iii/](https://ruralindiaonline.org/library/resource/report-on-the-census-of-british-india-taken-on-the-17th-of-february-1881-vols-i-iii/)


◆◆◆◆

अब तक बॉम्बे प्रान्त, एक ब्राह्मण विरुद्ध आंदलोन का एक मंच बन चुका होता है। वहाँ पर स्पेशल सर्वे करवाया जाता है, ब्राह्मण एवं अन्य कास्ट के लोगों की ब्रिटिश सरकारी तंत्र में किसका कितना संख्या है। कितना % है। ऐसा तुलनात्मक सर्वे तमिलनाडु (मद्रास) में भी करवाते हैं।


इसी समय राजा शाहू जी महाराज भी श्री फुले का सहयोग करते हैं। इसके बाद बहुत से विशेष घटनाएं घटती हैं।


अभी तक ब्रिटिशों को कॉस्ट, जाति, वर्ण में भेद नहीं पता होता है। इसी समय एक बहुत ही शक्तिशाली कॉलिनियल ब्रिटिश नौकर H H Risley भारत आता है। वह भरतियों को नाक के ऊंचाई के आधार पर अलग अलग कास्ट में बांटने की योजना बनाता है।


माननीय फुले जी अपने कार्यक्रम क्रिया कलाप में लगे रहते हैं। ड्रामा कके सबको अवगत कराते हैं कि सबसे साथ विदेशी ब्राह्मण ने क्या किया है। 


सोचिए, सब मानते गए! कैसे? 


जिसे हम आगे देखेंगे!


◆◆◆

Copy paste 




#बैकवर्ड_क्लास_की_पहचान_कैसे_बना_ब्राह्मण_विरुद्ध_आन्दोलन